कणकवली (प्रतिनिधी)
बंधुता, समता समाजात प्रस्थापित होणे आवश्यक – तहसीलदार दीक्षांत देशपांडे
आप्पासाहेब पटवर्धन चौकात आंबेडकर जयंती साजरी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची घटना लिहिताना ३०० देशांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास केला होता. डॉ. आंबेडकर यांचे कार्य महान आहे. राज्यघटनेवर भारत देश चालतो. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेची माहिती असली पाहिजे. देशात स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी आपले संपुर्ण आयुष्य वचले. भारत देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू असून समाजात स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समता प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, अॅड. उमेश सावंत, अॅड. सुदीप कांबळे, विश्वनाथ कदम, जनीकुमार कांबळे, सूर्यकांत कदम, शंकर कदम, संदीप कदम, सचिन तांबे, दीपक कांबळे, नारायण जाधव, भीमराव जाधव, दिलीप जाधव, प्रकाश कांबळे, राजेश कदम, प्रभाकर कदम, संतोष जाधव, किशोर कदम, संतोष कदम, संदीप तांबे, रोहन कदम, महेंद्र कदम, श्रद्धा कदम, सी. आर. चव्हाण, आदी उपस्थित होते.
अॅड. उमेश सावंत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दातृत्व, कर्तृत्व महान आहे. डॉ. आंबेडकर राज्यघटना लिहितांना सर्व घटकांचा विचार केला होता. देशात सध्या सत्ताधारी मंडळींकडून विरोध व अल्पसंख्याकाचे म्हणणे एेकून घेतले जात नाही. ही बाब देशासाठी शोभनिय नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या विरोधकांना सत्तेत स्थान दिले होते. डॉ. आंबेडकर यांचे विचार व आचार महान असून प्रत्येकाने त्यांचे विचार व आचार आत्मसात केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी करून सध्याच्या राजकीय स्थितीवर सावंत यांनी भाष्य केले.
कोककरत्न पुरस्कार मिळल्याबद्दल जनीकुमार कांबळे यांचा दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडे व भीम गीते सादर केली. गायन पार्टी कार्यक्रमात अक्षय कदम यांनी भीम गिते सादर केली. मेलेडी म्युझिशियन विनोद जाधव यांनी गीते सादर केली. सिद्धार्थ कांबळे व जनीकुमार कांबळे यांनी भीमे गिते सादर केली. दरम्यान, आंबेडकर प्रेमींनी या जयभीम महोत्सवाला उपस्थित दर्शवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.





