देवगड (प्रतिनिधी)
रविवार ६ एप्रिलला मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
मिठबाव कातवण तांबळडेग या तीन गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिर मिठबाव येथे श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या वतीने रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी “श्रीराम नवमी उत्सव” मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण दिवसभर भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिर मिठबाव येथे करण्यात आले आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रम : सकाळी ८:३० ते ९:३० वा उत्सवाची सुरुवात रघुपति पूजनाने होणार आहे.सकाळी ९:३० ते १० सामूहिक रामरक्षा स्तोत्रपठण, १० ते १२:४५ ह. भ. प. केदार दौलत सावंत यांचे श्रीराम नवमी उत्सव किर्तन , दुपारी १२:३९ वा प्रभू श्रीराम जन्म,आरती आणि पालखी प्रदक्षिणा पार पडेल, त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल.
सायंकाळी ५ ते ६ वा पुराणवाचन,सायं ६ ते ७:३० भक्ती संध्या अंतर्गत कु. सुधांशू समीर सोमण (मिठबाव) यांचे सुश्राव्य गायन ,सायं ७:३० ते ८ सांज महाआरती व रघुपति आरती ,रात्रौ ८ ते ९:३० ह. भ. प. सौ. आरती सुनील बापट यांचे प्रभावी कीर्तन होईल.रात्रौ ९:३० नंतर पालखी प्रदक्षिणाने उत्सवाची सांगता होईल.





