देवगड मळई येथे ११ एप्रिलपासून हनुमान जयंती उत्सव

20

 

देवगड/ प्रतिनिधी

देवगड मळई येथे ११ एप्रिलपासून हनुमान जयंती उत्सव

मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा यांच्यावतीने तेथील श्री हनुमान मंदिराचा वर्धापन दिन व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ११ ते १३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

११ रोजी सकाळी ७.३० वा. पूजा, आरती, ८.३० वा. लघुरुद्र, ११ वा. पासून मळई मर्यादित रांगोळी, चित्रकला, कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर व प्रश्नोत्तर स्पर्धा, सायंकाळी ६.३० वा. महाआरती, ७ वा. स्थानिक भजन (बुवा- मोरेश्‍वर मेस्त्री), रात्री ९ वा. स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार “फुगडी’. १२ रोजी सकाळी ६.२४ वा. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती, दर्शन व तिर्थप्रसाद, ८ वा. पालखी प्रदक्षिणा, ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वा. तिर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. महाआरती, श्रीदेव मांडकरी प्रासादिक भजन मंडळ- मळईचे बुवा सत्यवान मणचेकर यांचे भजन, ७ वा. कोयंडे बंधू प्रासादिक भजन मंडळ- कालवीचे बुवा गुणाजी कोयंहे यांचे भजन, रात्री ८.३० वा. श्री मंगलमूर्ती भजन मंडळ, मळईचे बुवा प्रशांत (नानू) कणेरकर यांचे भजन, रात्री १० वा. परफेक्ट बीट डान्स अकॅडमी, जामसंडे यांचा नृत्याविष्कार “कलारंग, कोकण कलाकारांचे. 13 रोजी सायंकाळी ४ वा. महिलांसाठी होम मिनीस्टर स्पर्धा, रात्री १० वा. स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार रयतेचा राजा’ असे कार्यक्रम होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.