आचरा गोल्डन बिच पिरावाड येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 114 कासव पिल्लाना कासवमित्र सुर्यकांत धुरी पिरावाडी पो.पाटील सौ तन्वी जोशी यांच्या हस्ते आचरा समुद्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाणे हवालदार सुदेश तांबे विशाल वैजल,प्राथमिक आरोग्य केंद्र आचरेच्या वैद्यकियअधिकारी झेवेरियस मुजावर, शिक्षक समीर चव्हाण, पिरावाडी जिप शाळेची मुले तसेच शलाका कांदळगावकर व पर्यटक आदी उपस्थित होते.