वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पिंगुळी विभागाच्या वतीने आनंदाश्रयाला धान्य भेट 

15

कुडाळ (प्रतिनिधी)

 

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पिंगुळी विभागाच्या वतीने आनंदाश्रयाला धान्य भेट 

 

     माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंगुळी विभागाच्या वतीने बुधवारी आनंदाश्रय आश्रम अणाव येथे धान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
     माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे शिवसेना पिंगुळी विभागातील पदाधिकाऱ्यांनी अणाव येथील आनंदाश्रय आश्रमाला भेट देऊन आश्रमाचे संचालक बबन परब आणि विद्या वारंग यांच्याकडे निराधार व्यक्तींना गोड जिलेबी, बिस्कीट पुडे, जीवनावश्यक वस्तू व कडधान्य आदी साहित्य सुपूर्द केले. पिंगुळी विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य भरत परब, मिलिंद परब, बाबल गावडे, शाखाप्रमुख चेतन राणे, अजय बांदेकर, प्रदीप पुरलकर, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे, राजेश टंगसाळी, माजी युवासेना विभाग प्रमुख हेमंत पिंगुळकर, युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर, रामा पिंगुळकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बबन परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. असेच आपल्या वतीने एक मदतीचा हात आमच्या पाठीशी सदैव असूदे असे सांगत सर्वांचे आभार मानले.