माजी जि.प.अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिनानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम

37

 

कणकवली (प्रतिनिधी)

माजी जि.प.अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिनानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ३ एप्रिल रोजी ५१ वा वाढदिवस आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ३ एप्रिल रोजी कनेडी येथे वाढदिवस कार्यक्रमाबरोबरच शुभेच्छा एसटीएस परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी गुरुवार २७ व शुक्रवार मार्च या कालावधीत १५१ ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पंढरपूरवारी आयोजित केली आली आहे. वारीमध्ये मध्ये नरसोबाचीवाडी, तुळजापूर, पंढरपूर यात्रा घडविण्यात येणार आहे.

शनिवार, २९ मार्च रोजी स. ९ वा. कनेडी बाजारपेठ येथे भव्य रामादान शिबीर होणार आहे. सोमवार ३१ मार्च रोजी सार्थ ७ वा. सांगवे-कनेडी बाजारपेठ येथे ‘छाया’ चित्रपट टाखविण्यात येणार आहे. मंगळवार, १ एप्रिल रोजी मुलगे व मुलीसाठी इ. १ ली ते ४ थी, इ. ५ वी ते ७वी आणि इ. ८ वी ते १० वी अशा तीन गाव रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि भेटवस्तू देण्यात येणार आहेत. याशिवाय ड्रोन उडविण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

 

बुधवार २ एप्रिल रोजी दुपारी २ वा. कनेडी बाजारपेठ येथे पाककला स्पर्धा होणार आहे. यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे मिक्सर, प्रेशर कुकर, व सिलिंग फैन देण्यात येणार आहे. तर ४ ते १० क्रमांकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. याच दिवशी सायं ६ वा. ‘होम मिनिस्टर’, ‘सखेळ पैठणीचा स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्या महिलेला बॉशिंग मशिन व पैठणी देण्यात येणार आहे. तर उपविजेतीला एलईडी टिव्ही भेट देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाला मिक्सर देण्यात येणार आहे. याशिवाय ते १० क्रमांकांना आकर्षक भेटवस्तू व
उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. यामधील विजेत्या प्रेक्षकाला एलईडी टिव्ही देण्यात येणार आहे. तर २ ते to क्रमांकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

गुरुवार ३ एप्रिल रोजी स. १० वा. वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम सांगवे-कनेडी बाजारपेठ येथे होणार आहे. ११ वा. भिरवंडे येथील ‘मातोश्री वृध्दाश्रम’ येथे फळे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. दु.१२ वा. करंजे येथील दिव्यांग शाळेत पोषण आहार साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दुपारी ३ वा. ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ या परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.yuvasandeshsts20 25.com या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वा. कनेडी येथील समाधी पुरुष हॉलमध्ये वारकरी भजन स्पर्धा होणार आहे. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्ह तसेच सहभागी सर्व मंडळींना प्रवासखर्चही देण्यात येणार आहे.

 

सर्वांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संदेश सावंत मित्रमंडळ व युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.