कणकवली ( प्रतिनिधी)
ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी कुडाळ मार्फत कळसुली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर
कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी कुडाळ द्वारे ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ग्रामीण भागातील कार्यरत असणाऱ्या या प्रशालेमधील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी व त्यांची आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतूने दरवर्षी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीमार्फत पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
यावर्षीची शिष्यवृत्ती कु. दुर्वांक सुभाष नाईक (इयत्ता सातवी) कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री (इयत्ता नववी) कु. कांचन मनोहर घाडीगावकर (इयत्ता आठवी) आणि कु. सुजल सुनील गुरव (इयत्ता दहावी) कु.आर्या आनंद राणे (इयत्ता अकरावी) अशा पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३६०० रु. त्यांच्या बँक खाती जमा करण्यात आली. यासाठी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीचे अध्यक्ष श्री प्रसाद परब यांचे मुख्याध्यापक श्री व्ही. व्ही.वगरे आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी ॠण व्यक्त केले ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी कुडाळ या संस्थेला त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या शिष्यवृत्तीसाठी विशेष प्रयत्न श्री. अमर पवार आणि संगणक शिक्षक श्री. रविकांत नाईक यांनी केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक,ग्रामस्थ यांस कडून अभिनंदन करण्यात आले.





