विधी मोरये हिचे लॉन टेनिस स्पर्धेत मिळविले विजेतेपद

34

 

कणकवली ( प्रतिनिधी)

विधी मोरये हिचे लॉन टेनिस स्पर्धेत मिळविले विजेतेपद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव वाशिनवाडी येथील विधी विष्णू मोरये यांनी लॉन टेनिस स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा दादर येथील शिवाजी पार्क जिमखाना येथे पार पडली. गेली दोन वर्षे विधीने या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले.

विधी ही गेल्या पाच वर्षांपासून लॉन टेनिस खेळ खेळत असून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल, विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. सध्या ती अनुजा महेश्वरी यांच्याकडे या खेळाचे धडे घेत असून या परदेशी खेळामध्ये ती आपले बेस्ट देण्याचे प्रयत्न करत आहे.

विधी ही बी ए एल एल बी चे शिक्षण घेत असून श्रीमंत लोकांच्या या खेळात ती स्वतःच्या परिश्रमांवर पुढे जात आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशन ची ती सदस्य असून केवळ आवड आणि आपल्या बाबांचे स्वप्न म्हणून तिने या खेळाकडे लक्ष दिले. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत तिने अंतिम विजेतेपद पटकावले असून युनिव्हर्सल स्पोर्टसचे नरेन शहा यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

घरात कोणीही खेळाडू नसताना विधीने या खेळात घेतलेली भरारी नांदगावच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक भूषणावह आणि अभिमानास्पद आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.