पिंगुळी येथील परशुराम तु. तेंडुलकर यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. तेंडुलकर गुरुजी या नावाने सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
एक उत्तम दशावतार कलावंत, ज्योतिष शास्त्र पारंगत, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि पेन्शन असोसिएशन चे सल्लागार म्हणून ते परिचित होते. सेवानिवृत्त तालुका मास्तर असल्याने तेंडुलकर गुरुजी या नावाने त्यांना ओळखले जाई.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे.