अवैध धंदयाचे आरोप केले तेच मांडीला मांडी लावून बसले ; त्यांच्यावर केलेले आरोप आता तरी मिटतील का ? युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सवाल

38

 

देवगड : प्रतिनिधी

अवैध धंदयाचे आरोप केले तेच मांडीला मांडी लावून बसले ; त्यांच्यावर केलेले आरोप आता तरी मिटतील का ? युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सवाल

ज्यांच्यावर अवैध धंद्याचे नितेश राणे यांनी आरोप केले तेच आज भाजपात प्रवेश करून मांडीला मांडी लावून बसले.त्यामुळे त्यांच्यावर केलेले आरोप मिटतील का असा सवाल उबाठा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.नितेश राणे भाजपात प्रवेश करण्यासाठी साम दाम दंड या नीतीचा वापर करीत आहेत परंतु उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या नीतीला जुमानणार नाहीत.पुर्वीप्रमाणेच उबाठा शिवसेना कोकणात उभी राहील असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

 

देवगड येथील उबाठा शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत सुशांत नाईक बोलत होते.यावेळी नवनियुक्त तालुकाप्रमुख रqवद्र जोगल, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडीप्रमुख सौ.हर्षा ठाकूर, सौ.रेश्मा सावंत, नगरसेवक विशाल मांजरेकर, दादा पडेलकर,विकास कोयंडे, प्रफुल्ल कणेरकर, गणेश कांबळी,दिनेश पारकर,गौरव सावंत आदी उपस्थित होते.

 

यावेळी सुशांत नाईक म्हणाले, .शिरगाव मधील पदाधिकारी यांच्या भाजपा प्रवेशावेळी इतर कोणतेही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले नाहीत.शिरगावमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उबाठा शिवसेनेसोबतच आहेत जे गेले ते तिकीट मिळविण्यासाठी गेले असा आरोप नाईक यांनी केला.उबाठा शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला मात्र त्यांच्यावरच नितेश राणे यांनी अवैध धंद्याचे आरोप केले तेच नगरसेवक त्यांचा मांडीला मांडी लावून आता बसले त्यामुळे त्यांच्यावर केलेले आरोप मिटतील का असा सवाल नाईक यांनी केला.विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी देणार नाही असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.कोणताही मंत्री हा त्या सरकारचा भाग असतो तो जनतेचा सेवक असतो मात्र नितेश राणे हे विसरले असून आपल्या पक्षातील लोकांना निधी देणार.भाजपात येण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या ब्लॅकमेलींग करून, त्यांना त्रास देवून, पदाची किंमत ठरवून विकत घेवून भाजपात प्रवेश करून नीती अवलंबली परंतू पक्षात प्रवेश करण्यासाठी यापुढे कोणतीही जुलूम जबरदस्ती करा, तंत्र अवलंबा उबाठा सेनेचा कार्यकर्ता हा जाग्यावरच राहील व यापुढे कोकणात उबाठा शिवसेना पक्ष वाढलेला दिसेल.बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणात शिवसेना वाढविणेचे स्वप्न उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुर्ण करतील असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.