Home वैभववाडी देवगड तहसीलदार म्हणून आर. जे. पवार यांची नियुक्ती

देवगड तहसीलदार म्हणून आर. जे. पवार यांची नियुक्ती

294
वैभववाडी (प्रतिनीधी)

देवगड तहसीलदार म्हणून आर. जे. पवार यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली देवगड तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे व सध्या मुंबई उपनगर अंधेरी येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले आर. जे. पवार यांची देवगड तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे. आर .जे. पवार हे लोकाभिमुख सेवा देणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.
कणकवली तालुक्यामध्ये नायब तहसीलदार तहसीलदार या पदावर सेवा देताना त्यांनी जनतेची कामे करत आपली जनसामान्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांची देवगड येथे बदली झाली होती. व देवगड येथून आर जे पवार यांची अंधेरी उपनगर या ठिकाणी बदली झाली होती. मात्र त्यांना पुन्हा एकदा देवगड तालुक्यात तहसीलदार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.