पाईपलाईन फुटल्याने देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद आहे.
देवगड नळयोजनेचे दुखणे संपता संपत नसुन पाईपलाईन फुटणे हे नित्यनेमाचे झाले आहे.इळये सावरघाटी येथे पाईपलाईन फुटल्याने देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद आहे.
गेल्या महिनाभरात असतानाच नळयोजनेच्या दहिबांव पंप हाऊस येथिल स्टार्टरची कॉईल जळणे, दुरूस्ती जलवाहीनी वरचेवर फुटणे यामुळे पाणीपुरवठा बंद राहण्याचे प्रकार वारंवार घडत असून यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जलवाहिनीची गंभीर अवस्था, पंप दोन तर मोटर एक अशी स्थिती यामुळे पंपंीग यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर पाणीपुरवठा बंद राहण्याच्या घटना यापुर्वीही घडल्या आहेत.दहिबांव वरून पाणीपुरवठा करणाèया योजनेची अशी गंभीर स्थिती असताना मात्र सद्यस्थितीत देवगड जामसंडे शहरवासियांना पाणीपुरवठा करणारी योजना सक्षम करणे गरजेचे आहे.या नळयोजनेच्या दुरूस्ती व सुधारणा करण्याचा कामासाठी ९ कोटी २१ लाख रकमेची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे.मात्र नळयोजनेची सद्यस्थिती पाहता दुरूस्ती व सुधारणा करण्याचे काम पुढील प्रक्रिया पुर्ण होवून लवकरात लवकर होणेही तितकेच गरजेचे आहे.तरच नवीन योजना अस्तित्वात येईपर्यंत या योजनेद्वारे देवगड जामसंडेवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होईल.