सावंतवाडी (प्रतिनीधी)
जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था माडखोल विजेता
संचालक व्यवसाय शिक्षण संचालनालय मुंबई यांच्या तंत्र प्रदर्शन व क्रीडा स्पर्धा यांच्या आयोजना अंतर्गत पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या क्रिडामैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 शासकीय आय टी आय व 1 खाजगी आय टी आय असे एकूण 9 औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी सहभाग दर्शविला, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, हॉलीबॉल हे सांघिक खेळ तर रांगोळी, कॅरम, 100 मीटर धावणे 100 ते 400 मीटर रिले या वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.





