जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना सावंतवाडी पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण मार्गदर्शन या अनुषंगाने बांदा परिसरातील महिला सरपंच ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडीमध्ये पुरवण्यात येणारा बालकांसाठी सकस आहार .आहारापासून बनविलेले विविध खाद्यपदार्थांचे नमुने ठेवले होते.
बाल विकास ममता देसाई पर्यवेक्षक सिंधू बाई पवार भाजपाच्या महिला बांदा ग्रामपंचायत च्या सरपंच प्रियंका नाईक उपसरपंच राजाराम धारगळकर बीजेपीच्या जिल्हाप्रमुख सौ.श्वेता कोरेगावकर बांदा उपसरपंच आबा धारगळकर तसेच बांदा परिसरातील बहुसंख्य सरपंच व मार्गदर्शक म्हणून नारायण परब ॲड. पूजा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक नारायण नाईक यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायत आराखडा व पंचायत कारभार याविषयी मार्गदर्शन केले तर एडवोकेट पूजा यांनी महिलांना कायदेविषयक विशेषता कौटुंबिक हिंसाचार व पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बांदा विभागातून अनेक अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पर्यवेक्षक आदी उपस्थित होत्या.