पाडलोस व्हाट्सअप ग्रुप वतीने बाल क्रीडा महोत्सवाचे आयोजन

3

 

बांदा (मंगल कामत)

 

पाडलोस व्हाट्सअप ग्रुप वतीने बाल क्रीडा महोत्सवाचे आयोजन

विद्यार्थ्यांमध्ये असलेली इच्छाशक्ती, उत्साह आणि मेहनत यामुळे शालेय जीवनात प्रगती साधता येते. त्याचप्रमाणे अंगी शिस्तीचे पालन केल्यास खेळामध्ये देखील प्रगती साधता येते. अशा स्पर्धांतून गावातील खेळाडू राज्यस्तरावर झळकावले असे प्रतिपादन पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर यांनी केले.

 

पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित गाव मर्यादित तिन्ही प्राथमिक शाळांचा एकत्रित बालक्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाडलोस उपसरपंच राजू शेटकर, पाडलोस व्हाट्सअप गाव ग्रुपचे अध्यक्ष पपी गावडे, पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, शाळा नं 1 च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, शिक्षक विजय गावडे, अनिल वरक, अस्मिता आरोसकर, अमोल प्रभू तसेच गाव ग्रुपचे खजिनदार अमेय गावडे, पालक, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

बाल क्रीडा महोत्सवात पन्नास मीटर धावणे पहिली ते दुसरी मध्ये मुलगे प्रथम कृष्णा मदन कुबल, द्वितीय वेद विष्णू गावडे, तृतीय वैभव विश्वनाथ नाईक. शंभर मिटर धावणे प्रथम अद्वैत सुरज गावडे, द्वितीय वेद विष्णू गावडे, तृतीय वैभव विश्वनाथ नाईक. लांब उडी प्रथम कृष्णा मदन कुबल, द्वितीय वैभव विश्वनाथ नाईक, तृतीय वेद विष्णू गावडे. उंच उडी प्रथम अद्वैत सुरज गावडे, द्वितीय कृष्णा मदन कुबल, तृतीय वैभव विश्वनाथ नाईक.

इयत्ता पहिली ते दुसरी मुली 50 मीटर धावणे प्रथम दूर्वा बापू गावडे, द्वितीय आर्या वामन केणी, तृतीय दूर्वा कृष्णा गावडे. शंभर मिटर धावणे प्रथम दूर्वा बापू गावडे, द्वितीय आर्या वामन केणी, तृतीय दूर्वा कृष्णा गावडे. लांब उडी प्रथम तन्वी उल्हास पाडलोस्कर, द्वितीय दूर्वा बापू गावडे, तृतीय आर्या वामन केणी. उंच उडी प्रथम तन्वी उल्हास पाडलोस्कर, द्वितीय आर्या वामन केणी, तृतीय दूर्वा बापू गावडे. इयत्ता तिसरी ते चौथी मुलगे 50 मिटर धावणे प्रथम चिराग कृष्णा गावडे, द्वितीय गोपाळ कृष्ण नाईक, तृतीय विष्णू मंगेश पेडणेकर. शंभर मिटर धावणे प्रथम चिराग कृष्णा गावडे, द्वितीय विष्णू मंगेश पेडणेकर, तृतीय गोपाळ कृष्णा नाईक. लांब उडी प्रथम चिराग कृष्णा गावडे, द्वितीय गोपाळ कृष्णा नाईक, तृतीय अथर्व संजय नाईक. उंच उडी प्रथम गोपाळ कृष्णा नाईक, द्वितीय चिराग कृष्णा गावडे, तृतीय देवराज संदीप गवस.

तिसरी ते चौथी मुली 50 मिटर धावणे प्रथम आर्या सुनील गावडे, द्वितीय वैभवी अरुण गवस, तृतीय वैदेही अरुण गवस. शंभर मीटर धावणे प्रथम आर्या सुनील गावडे, द्वितीय वैभवी अरुण गवस, तृतीय वैदही अरुण गवस. लांब उडी प्रथम आर्या सुनील गावडे, द्वितीय रिद्धी सावळाराम गावडे, तृतीय वैदही अरुण गवस. उंच उडी प्रथम आर्या सुनील गावडे, द्वितीय खुशी अंकुश हरिजन, तृतीय सिया मनोज कुबल. फनी गेम पहिली ते दुसरी मुली व मुलगे बादलीत चेंडू टाकणे प्रथम दूर्वा बापू गावडे, द्वितीय तनवी उल्हास पाडलोस्कर, तृतीय वेद विष्णू गावडे व नाना गवस. लिंबू चमचा प्रथम दूर्वा बापू गावडे, द्वितीय तनवी उल्हास पाडलोस्कर, तृतीय आर्या वामन केणी. मुलगे प्रथम वेद विष्णू गावडे, द्वितीय वैभव विश्वानाथ नाईक, तृतीय युवराज उमेश पाडलोस्कर. फुगे फोडणे मुली प्रथम आर्या वामन केणी, द्वितीय दूर्वा कृष्णा गावडे. मुलगे प्रथम वेद विष्णू गावडे, द्वितीय युवराज उमेश पाड्लोस्कर. पाढे पाठांतर प्रथम वेद विष्णू गावडे, द्वितीय अद्वेत सुरज गावडे, तृतीय दूर्वा कृष्णा गावडे व कृष्णा मदन कुबल. अनुलेखन प्रथम दूर्वा बापू गावडे, द्वितीय कृष्णा मदन कुबल, तृतीय दूर्वा कृष्णा गावडे.

इयत्ता तिसरी ते चौथी बादलीत चेंडू टाकणे मुली प्रथम संजीवनी चंद्रकांत नाईक, द्वितीय खुशी अंकुश हरिजन. मुलगे प्रथम गोपाळ कृष्णा गावडे, द्वितीय तुकाराम ज्ञानेश्वर नाईक. फ़ुगे फोडणे मुली प्रथम सिया मनोज कुबल, द्वितीय रिद्धी सावळाराम गावडे, मुलगे प्रथम गोपाळ कृष्णा गावडे, द्वितीय तुकाराम ज्ञानेश्वर नाईक, तृतीय आर्यन केशवा आईर. पाढे पाठांतर प्रथम वैदेही अरुण गवस, द्वितीय देवराज संदीप गवस, तृतीय विष्णू मंगेश पेडणेकर. अनुलेखन प्रथम सिया मनोज कुबल, द्वितीय विष्णू मंगेश पेडणेकर, तृतीय रिद्धी सावळाराम गावडे यांनी बक्षीस पटकावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल वरक यांनी केले. प्रास्ताविक पालक शिक्षक समिती अध्यक्ष तेजल गावडे यांनी तर आभार पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपचे अध्यक्ष पपी गावडे यांनी मानले.