न.पं.हद्दीतील रस्त्यांची हॉटमिक्स कामे कोल्डमिक्स करावी या विषयावरून सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, नितीन बांदेकर, सौ.तन्वी चांदोस्कर या नगरसेवकांनी रस्ते टिकणे व दर्जेदार होण्यासाठी हॉटमिक्सच पर्याय योग्य असल्याचे ठामपणे सांगत आमच्या प्रभागातील रस्ते हॉटमिक्सच करावेत अशी मागणी केली.
देवगड जामसंडे न.पं.ची मासिक सर्वसाधारण सभा न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, बांधकाम सभापती शरद ठुकरूल, पाणीपुरवठा सभापती सौ.प्रणाली माने, स्वच्छता सभापती सौ.आद्या गुमास्ते उपस्थित होते.
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विविध योजनांमधून मंजूर असलेली प्रगतीपथावरील हॉटमिक्स स्वरूपाची कामे कोल्ड मिक्स करण्याचा विषय सभेत चांगलाच गाजला.हॉटमिक्स रस्ते पाच वर्षे तरी टिकतील.चांगले दर्जेदार रस्ते व्हावेत हाच हॉटमिक्स रस्ते करण्याचा उद्देश आहे असे नगरसेवक नितीन बांदेकर यांनी सांगीतले.यावेळी न.पं.हद्दीतील रस्ते चांगले, टिकावू होण्यासाठी ते हॉटमिक्सच करण्यात यावे असे मत नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, नितीन बांदेकर व तन्वी चांदोस्कर, स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.
विकासकामांच्या मुदतवाढीचा विषयही चांगलाच गाजला. नगरसेवक नितीन बांदेकर यांनी संबंधित ठेकेदार मुदतवाढीकरीता जी कारणे देत आहेत ती संयुक्तिक नसून मुदतवाढीमुळे शासनाचा निधीही वेळेत खर्च होत नाही यामुळे मुदतवाढ देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करून याला आपला विरोध असल्याचे सभागृहात सांगीतले.यावेळी नगरसेविका सौ.तन्वी चांदोस्कर यांनीही बांदेकर यांचे मत बरोबर आहे मात्र विकासकामांचा निधी मागे जाईल यामुळे विलंब शुल्क आकारून कामे करून घेण्यात यावीत मात्र यापुढे असे प्रकार होता नये असे मत व्यक्त केले तर नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनीही बांदेकर यांचे मत बरोबर आहे मात्र निधी मागे जावू नये यासाठी मार्च अखेरपर्यंत विकासकामांना मुदतवाढ देवून त्या कालावधीत पुर्ण न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगीतले.
नळग्राहकांना पाणी बीलांचे वाटप वेळेत होत नाहीत याकडे पाणीपुरवठा सभापती सौ.प्रणाली माने यांनीच सभागृहाचे लक्ष वेधले यावेळी बांधकाम सभापती शरद ठुकरूल यांनी बील भरणा तारीख होवून गेल्यानंतर ग्राहकांना पाणीबील देण्यात आल्याचे सभागृहात सांगीतले. यापुढे पाणीबील १५ दिवस अगोदर ग्राहकांना देण्यात यावे तसेच नळ मीटरचे रिडींग प्रत्यक्ष घेतले जात नसल्याचा नळग्राहकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे रिडींग घेणाèया कर्मचाèयांनी प्रत्यक्ष रीडींग जावून घ्यावे अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
नाचणकर घर ते गोगटे मार्ग कडे देवगड हायस्कूलच्या मागून जाणाèया रस्त्याला मध्येच भगदाड पडले आहेत याबाबत लेखी कळवूनही न.पं.प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही ही बाब गंभीर असून त्याठिकाणी कोणताही अपघात झाल्यास न.पं.प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सभेत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी दिला.