ज्येष्ठ पत्रकार , रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन;

3371

सावंतवाडी (प्रतिनीधी)

ज्येष्ठ पत्रकार, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन

दैनिक तरुण भारत संवाद सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (48 रा.सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

 

ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांचे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते तेथे मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टर यांनी त्यांना मृत घोषित केले. मूळ सातोसे गावचे सुपुत्र असलेल्या प्रवीण मांजरेकर यांनी कॉलेज जीवनापासूनच पत्रकारितेला प्रारंभ केला. सुरुवातीला गाव वार्ताहर त्यानंतर बांदा प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. नंतरच्या काळात ते सावंतवाडी कार्यालयात उपसंपादक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

कॉलेज जीवनापासून त्यांना नाट्य क्षेत्राची आवड असल्याने दरवर्षी नाट्य स्पर्धेतील नाटके सादरी करीत. त्यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली विविध नाटके सादर केली आहेत. विविध नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. सावंतवाडी तालुका भंडारी समाज संघटनाच्या कार्यातही त्यांच्या सहभाग होता. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणीत त्याची सहसचिव म्हणून निवड झाली होती.

आज बुधवारी ओरोस येथे जिल्हातील पत्रकाराच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असतानाच क्रिकेटचे मैदानावरच ते खाली कोसळले. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली असा परिवार आहे .ओरोस येथील विद्याविहार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सुषमा मांजरेकर – गोडकर यांचे ते पती होत.