सत्ता असो वा नसो जनसेवेचे हाती घेतलेले हे व्रत यापुढेही अखंडपणे जोपासणार – सतीश सावंत

36

 

कणकवली (प्रतिनिधी)

सत्ता असो वा नसो जनसेवेचे हाती घेतलेले हे व्रत यापुढेही अखंडपणे जोपासणार – सतीश सावंत

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ आपण सामाजिक, राजकीय जीवनात कार्यरत असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करत आलो आहे.या क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला लाभले आहेत. गेल्या काही वर्षात अनेक विकासकामे आपण भिरवंडे गावात राबविली. सत्ता असो वा नसो जनसेवेचे हाती घेतलेले हे व्रत यापुढेही अखंडपणे जोपासणार असल्याचे ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी भिरवंडे
येथे आयोजित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना सांगितले.

सतीश सावंत यांचा ६० वा वाढदिवस शनिवारी सायंकाळी त्यांच्या भिरवंडे येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. स्वाती सावंत, मुलगा शर्विल आणि कुटुंबीय त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, हरकुळ ब्रु. सरपंच आनंद ठाकूर, माजी पं.स. सदस्य मंगेश सावंत, मोहन सावंत तसेच भिरवंडे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सतीश सावंत यांच्या पत्नी सौ. स्वाती सावंत यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी सतीश सावंत यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांचा सत्कार केला. यावेळी संदेश पारकर, सुशांत नाईक आर्दीनी सतीश सावंत यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.