नंदकुमार पेडणेकर यांच्याकडून हडपीड प्राथमिक शाळेला एक्वागार्ड भेट

53

 

देवगड (प्रतिनिधी)

नंदकुमार पेडणेकर यांच्याकडून हडपीड प्राथमिक शाळेला एक्वागार्ड भेट

 

श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक् सचिव अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार प्राप्त यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार हडपीड खालचीवाडी शाळेला  Aquaguard भेट दिला आहे .
   

 

देवगड तालुक्यातील परिषद प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळावे या हेतूने रुपये 22000/ किमतीचा (UF+UV+zink and copper booster) एक्वागार्ड शाळेला प्रदान केला.त्यामुळे नियमितपणे शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आता शुद्ध पाणी मिळणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
त्यांच्या या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.रचना राजाराम कडू, उपाध्यक्ष श्री.संजय लवू राणे व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यार्थी व पालकांनी ऋण व्यक्त केले.