बांदा गावाच्या सीमा भागातील गावातून येतं आहे अवैध मायनिंग, साटेली मायनिंगच्या ट्रान्सपोर्ट चा घेतला जात आहे आधार, वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार, महसूल आणि खनीकर्म विभाग सुस्त
बांदा गावाच्या सीमा भागातील गावातून येतं आहे अवैध मायनिंग, साटेली मायनिंगच्या ट्रान्सपोर्ट चा घेतला जात आहे आधार, वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार, महसूल आणि खनीकर्म विभाग सुस्त
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणुन जाहीर झाल्या नंतर पर्यटन वाढीसाठी शासनाकडून नवनवीन योजना,उपक्रम आणले जात असताना हे जिल्ह्याला गालबोट लागलं ते खाण प्रकल्पांच.या प्रकल्पांमुळे हिरवेगार दिसणारे डोंगर बोडके झाले आणि दोनशे दोनशे तीनशे तीनशे फूट खोल भूगर्भ मध्ये मायनिंग खाणी मारल्या जात असल्याने पाणी टंचाईचा प्रश्नही काही गावांमध्ये निर्माण झाला आहे.असे असताना त्यातच मायनिंगची चोरटी वाहतुकीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बांदा गावाच्या सीमेलगत असलेल्या गावातून अवैध मायनिंग वाहतुक रेडीच्या दिशेने होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ज्या दिवशी साटेली मायनिंग ट्रान्सपोर्ट सुरु असतो त्यावेळीं गोव्यातून महारष्ट्र हद्दीत अवैध मायनिंग भरलेले डंपर हे सातार्डा साटेली मळेवाड मार्गे रेडीच्या दिशेने जातात. बघणाऱ्या व्यक्तीला सदरचे डंपर हे साटेली मायनिंगचे असल्याचे दिसुन येते. माञ अस नाही. हे डंपर साटेली मायनिंगच्या ट्रान्सपोर्ट ज्या मार्गावर चालतो त्या मार्गावरून जातात. याचाच अर्थ वाहत्या गंगेत हात धूण्याचे काम हे चोरटी मायनिंग वाहतूक करणारे दलालाना लगाम लागणे गरजेचे आहे. या वाहतुकीबाबत महसूल व खनीकर्म विभाग अनभिज्ञ असून अधिकारी सुस्त असल्याचे चित्र दिसुन येत आहे.