गढीताम्हाणे येथील पितापूत्राची कार अडवून मारहाण ; तीन संशयीतांवर गुन्हे दाखल 

378

 

 

देवगड – प्रतिनिधी

 

गढीताम्हाणे येथील पितापूत्राची कार अडवून मारहाण ; तीन संशयीतांवर गुन्हे दाखल 

 

 

गढीताम्हाणे येथील पितापूत्राची कार अडवून त्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी ओमकार विलास कदम (२५) याच्यासह अमित अमृत कदम (५५), विलास अमृत कदम (५२, सर्व रा. गढीताम्हाणे टेंबवाडी) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास गढीताम्हाणे मधलीवाडी बसस्टॉपनजीक घडली.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गढीताम्हाणे येथील आदित्य विकास कदम हे सोमवारी सायंकाळी वडिलांसोबत आपल्या ताब्यातील कारने (एमएच ४६- एन ३६७२) चांदोशीहून गढीताम्हाणेच्या दिशेने जात होते. गढीताम्हाणे मधलीवाडी बसस्टॉपनजीक त्यांची कार आली असताना तेथील संशयित ओमकार कदम, अमित कदम (५५), विलास कदम (५२) यांनी त्यांची गाडी फिर्यादी आदित्य कदम यांच्या कारसमोर लावून त्यांना अडविले. आदित्य कदम हे गाडीतून खाली उतरत असतानाच संशयितांनी त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडा फेकून मारून त्यांच्या डोक्यास दुखापत केली.

तसेच त्यांना व त्यांच्या वडिलांना संशयितांनी हाताच्या थापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच ‘परत आमच्या नादी लागला तर आम्ही सोडणार नाही’, अशी धमकी दिली. याप्रकरणी आदित्य कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीनही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.