महाराष्ट्रातील सागरी तालुक्यांमध्ये ड्रोन बेस सर्विलन्स अँड डिजिटल कमांड अँड कंट्रोल या सिस्टीमचे उद्घाटन

20

 

देवगड (प्रतिनीधी)

महाराष्ट्रातील सागरी तालुक्यांमध्ये ड्रोन बेस सर्विलन्स अँड डिजिटल कमांड अँड कंट्रोल या सिस्टीमचे उद्घाटन

 

ड्रोन सिस्टमद्वारे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवून अवैध मच्छीमारीला प्रतिबंध केला जाईल. यापुढे मच्छीमारी करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे मत महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

 

 

ना.नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या कंट्रोल रूममधून महाराष्ट्रातील सागरी तालुक्यांमध्ये ड्रोन बेस सर्विलन्स अँड डिजिटल कमांड अँड कंट्रोल या सिस्टीमचे उद्घाटन केले. त्यांच्या समवेत मुंबई येथे आमदार मनीषा कायंदे आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

 

महाराष्ट्राच्या सागरी तालुक्यांमध्ये या कार्यक्रमाचा त्याच वेळी शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रोन सिस्टीमचा शुभारंभ देवगड येथील किल्ला परिसरात करण्यात आला. यावेळी कार्यक्रम स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, देवगडचे तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, देवगडचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक तसेच मोहिमेचे नोडल अधिकारी भरत धुमाळ, ड्रोन देखरेख अधिकारी विकी चौरे, व सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर उपस्थित होते.

 

 

आमदार नितेश राणे यांनी या कार्यक्रमाचा अनौपचारिक शुभारंभ केला व पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले. ड्रोन सिस्टीमद्वारे जर अवैध मच्छीमारी करताना नौका सापडली, तर ती तातडीने जप्त करून जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी तारामुंबरी सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती तोरस्कर, देवगड सोसायटीचे उमेश कदम, देवदुर्ग सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाळेकर तसेच अन्य उपस्थित मच्छीमारी नेत्यांचे स्वागत करण्यात आले.

 

 

रत्नागिरीतील गस्तीनौकेवरील हल्ल्याची गंभीर दखल

 

 

रत्नागिरी येथे गस्तीनौकेवर कर्नाटक राज्यातील मलपी बंदरातील पर्सनेट ट्रॉलरने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चाकूहल्ल्याचाही समावेश आहे. आमदार नितेश राणे यांनी चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.तसेच या पर्सनेट ट्रॉलरवर जास्तीत जास्त दंड लावण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.