आचरा (प्रतिनिधी)
चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा आचरा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणणार ; भाजपा तालुकाध्यक्षासह कार्यकर्ते, ग्रामस्थ यांची आचरा पोलीस ठाण्याला धडक
गेल्या वर्षभरात आचरा पोलिस कार्यक्षेत्रात सातत्याने भर दिवसा चोऱ्यांचे प्रकार घडत असून कोणत्याही चोरीचा छडा लागलेला नाही. चोरटे मोकाट असून आचरा कार्यक्षेत्रातील लोकांची प्रचंड नाराजी आहेत महिला दहशतीखाली घरात राहू लागल्या आहेत बांगलादेशी, फेरीवाले यांचा सुळसुळाट झाला आहे आचरा पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसून येत्या महिन्याभारत झालेल्या चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा महिन्याभराने आचरा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणणार असल्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा पोलीस ठाण्यात धडक देत भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी यांनी दिला.
यावेळी आचरा पोलीस ठाण्याचा चार्ज असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उप निरीक्षक विशाल चोरगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मालवण तालुका भाजपा अध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण सोसायटी चेअरमन राजन गांवकर, राजन पांगे, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, वायंगणी माजी सरपंच हनुमंत प्रभू, चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, मनोज हडकर, सिद्धार्थ कोळगे, बाळू वस्त, समीर बावकर, बंटी भोवर, अमित गांवकर, वायंगणी ग्रामपंचायत सदस्या मालती जोशी, चंदू सावंत, भाई घाडीगांवकर, मनोज वराडकर, कृष्णा घागरे, ग्रामस्थ उपस्थित होते.





