सावंतवाडी (प्रतिनीधी)
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोहळा दिमाखात
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाचे व दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.





