भावपूर्ण श्रद्धांजली अम्मा

81

 

भावपूर्ण श्रद्धांजली अम्मा

मुंबई 
पद्मश्री सन्मानित 86 वर्षीय #तुलसी गौडा यांनी पर्यावरण संरक्षण आणि वनस्पतींची काळजी घेण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले..
वृक्षांप्रती असलेल्या अपार प्रेम आणि समर्पणासाठी “वृक्ष माता” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुलसी गौडा यांनी 86व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला; आणि त्यांनी लावलेल्या लाखो वृक्षांनी आपली माता गमावली.
2021 मध्ये जेव्हा तुलसी गौडा पद्मश्रीसारखा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतींच्या समोर पोहचल्या, तेव्हा त्यांच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणी पायाने आणि पारंपरिक आदिवासी पोशाखात आल्या होत्या.
कर्नाटकातील होनाली गावातील रहिवासी असलेल्या तुलसी दादी कधीही शाळेत गेल्या नाहीत.. पण अनुभवाच्या जोरावर त्यांनी झाडं-झुडपं आणि वनस्पतींचे इतके सखोल ज्ञान मिळवले की त्यांना ‘Encyclopedia Of Forests’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
लहानपणीच वडिलांचे निधन, लहान वयात लग्न आणि नंतर पतीला गमावल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी, तुलसी दादींनी सुमारे 60 वर्षांपूर्वी झाडांची काळजी घेण्यास सुरुवात केली…
तुमचा आदर्श आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील तुलसी अम्मा..