कुडाळ येथील युवकाचा आचरा येथे झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू…
कुडाळ : आचरा वरचीवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी पालेहसन झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी चढलेले आनंद वासुदेव वर्देकर वय वर्षे 48 (मुळ गाव कुडाळ वर्दे येथील) हे झाडावरून पडले होते. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणले असताना निधन झाले.याबाबतची खबर सुशांत सुनिल आचरेकर वय वर्षे 25 यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत आचरा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार मयत आनंद वासुदेव वर्देकर हे खबर देणारे आचरेकर यांच्याकडे माडावरचे नारळ काढण्यासाठी व जंगली झाडांची साफसफाई करण्यासाठी शुक्रवारी गेले होते. संध्याकाळी पाच वाजणेच्या सुमारास सुशांत आचरेकर यांच्या घराजवळील पालेहसनीच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना झाडावरुन खाली पडले . आचरेकर यांनी स्थनिक ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणला असता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत अधिक तपास आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुकाराम पडवळ करत आहेत.




