कणकवली (प्रतिनिधी)
कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये गीत गायन स्पर्धा संपन्न
कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली प्रशालेत झालेल्या शालेय स्तरीय गीत गायन स्पर्धेत २२ विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर गीतांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये श्री. प्रकाश दळवी (कळसुली शिक्षण संघ मुंबई सल्लागार) श्री के. आर. दळवी (स्कूल कमिटी चेअरमन) श्री नामदेव घाडीगावकर (स्कूल कमिटी व्हॉइस चेअरमन) सौ. शुभदा देसाई (स्कूल कमिटी सदस्या) श्री. शिवाजी गुरव (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगीत हा जीवनाचा अविभाज्यघटक असून संगीत कलेची जोपासना आणि संगीत कलेची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी दरवर्षी कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये गीत गायन स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीनही गटांमध्ये घेण्यात येतात.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक श्री व्ही. व्ही. वगरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि स्वरूप स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी यासारख्या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि यामधूनच भविष्यातील गायक, वादक तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपस्थितांमध्ये मार्गदर्शन करताना श्री के.आर दळवी यांनी या गीत गायन कार्यक्रमातून अनेक माजी विद्यार्थी यशस्वी गायक,वादक, संगीतकार म्हणून आज संगीत क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहेत या गीत गायन कार्यक्रमामुळे नवोदित गायक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम प्रशाला करत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
प्रमुख अतिथीमध्ये बोलताना श्री प्रकाश दळवी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत गाण्याचे महत्त्व, रियाज आणि आवड जोपासण्यासाठी विशेष मेहनत घेण्याचे महत्त्व खुमासदार शैलीत कथन केले.
विविध गायक, वादक तयार होण्यासाठी या स्पर्धा श्री के. आर दळवी( स्कूल कमिटी चेअरमन) यांनी त्यांचे भाऊ कै. लवू रामचंद्र दळवी(कळसुली शिक्षण संघ मुंबई माजी पदाधिकारी) यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत.
त्यामध्ये प्राथमिक गटात प्रथम क्रमांक कुमारी पूर्वी दिनेश सावंत द्वितीय क्रमांक कुमारी रिद्धी प्रमोद सावंत तर तृतीय क्रमांक कुमार धीरज शंकर गावकर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक कुमारी वेदिका रघुनाथ मेस्त्री द्वितीय क्रमांक कुमार रुद्र शिवाजी गुरव तर तृतीय क्रमांक कु.तन्वी मनोज मेस्त्री विद्यार्थ्यांनी प्राप्त केला तर उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक श्रीकृष्ण चंद्रकांत टिळवे द्वितीय क्रमांक कुमारी इक्रा मोहम्मद हनीफ पटेल तर तृतीय क्रमांक कुमारी आर्या आनंद राणे इत्यादी विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.
या स्पर्धेसाठी वाद्य वृंदांमध्ये कु.रुद्र गुरव कु. श्रीकृष्ण टिळवे कु.गणेश मेस्त्री, संस्कार पाडावे, गौरेश मेस्त्री,गौरव सावंत,प्रतिक राणे,गौरव भालेकर इत्यादी विद्यार्थ्यांनी संगीत साथ दिली तर स्पर्धांचे परीक्षण प्रशालेचे वरिष्ठ शिक्षक श्री. सावळ एस. के,श्री. रविकांत नाईक,श्री सी.एम.राणे यांनी पाहिले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अमर पवार आणि शालेय मंत्रिमंडळ मुख्यमंत्री संस्कार पाडावे आणि इतर मंत्री विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.





