मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक समन्वयक संघटनेच्या वतीने शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे संचालक यांना निवेदन

9

 

मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक समन्वयक संघटनेच्या वतीने शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे संचालक यांना निवेदन

देवगड (प्रतिनीधी)
मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने राहुल राखेवार संचालक , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले.

 

 

यावेळी समन्वय समितीचे राज्याध्यक्ष केशव जाधव महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, अखिल शिक्षक संघटनेचे, पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस मनोज मराठे , एकल शिक्षक संघटनेचे , तानाजी कुकनर राज्य कोषाध्यक्ष म.न.पा. शिक्षक संघटना यास अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबद्दल सविस्तर अशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा विविध संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना आश्वासित केलं.
जवळपास एक तास प्रदीर्घ अशी चर्चा होऊ शिक्षकासाठी ज्या जिल्ह्यात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा राबविल्या जात नाहीत त्या राबविण्याचे सर्व जिल्हा परिषदेत आदेशित करण्याचे तसेच विद्यार्थ्यांसाठी राज्यात व राज्याबाहेर विविध प्रेरणादायी स्थळांना भेटी देण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना आदेशित केले .यासह अनेक प्रश्नावर चर्चा करून अनेक अशैक्षणिक कामाचेही निवेदन त्यांना देण्यात आले.