जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुणकेश्वर नंबर 1 शाळेत बालोद्यान प्रदान सोहळा संपन्न

25

 

देवगड (प्रतिनीधी)
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुणकेश्वर नंबर 1 शाळेत बालोद्यान प्रदान सोहळा संपन्न
———————————————
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुणकेश्वर नंबर 1 या शाळेला दीक्षित फाऊंडेशन अंतर्गत सुसज्ज असे बालोद्यान उपलब्ध करून देण्यात आले.दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी बालोद्यान प्रदान सोहळा घेण्यात आला . बालोद्यानाचे उद्घाटन दीक्षित फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री निरंजन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुणकेश्वर गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच .श्री. महेश ताम्हणकर,श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष . श्री.एकनाथ तेली , श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध विश्वस्त तथा गावकर श्री. श्रीकृष्ण अनंत उर्फ राजू बोंडाळे उपस्थित होते . त्याच बरोबर वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. निलेश पेडणेकर , कुणकेश्वर चे उपसरपंच  श्री. शशिकांत लब्दे , शिक्षण प्रसारक मंडळ कुणकेश्वर चे चेअरमन श्री चंद्रकांत घाडी,कुणकेश्वर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.दीपक घाडी , चांदेल वाडीचे अध्यक्ष श्री हेमंत वातकर , खालची वाडी अध्यक्ष  श्री. दिलीप चव्हाण ,कुणकेश्वर केंद्राच्या केंद्रप्रमुख  सौ. भाग्यश्री जोईल ,कुणकेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. माधव यादव , वाडा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. नारायण माने , माजी शिक्षण विस्तार अधिकारी.श्री. तुकाराम तेली , प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री.संजय आचरेकर इत्यादी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तसेच कुणकेश्वर गावचे पालक, ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुणकेश्वर पंचक्रोशीत दीक्षित फाऊंडेशन ने केलेल्या भरीव मदतीबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.दीक्षित फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन दीक्षित यांचा सर्व ग्रामस्थ व शिक्षकवृंद यांच्याकडून जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. आनंद हिर्लेकर हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ अमृता पाटील यांनी केले . प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. तात्या लवटे यांनी केले. आभार श्री. विठ्ठल थिकोळे सर यांनी व्यक्त केले.