इन्सुली राज्य उत्पादनशुल्क पथकाची कारवाई: १६ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त

10

 

बांदा प्रतिनीधी 

इन्सुली राज्य उत्पादनशुल्क पथकाची कारवाई: १६ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त

बांदा पत्रा देवी रोडवर एका धाब्याजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना एकावर कारवाई करण्यात आली असून यात तब्बल 16,20,840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहन चालक शुभम शितोळे (वय 27) रा. सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे