लोकमान्य मल्टिपर्पजकडून उदयोजक भाऊ वळंजू यांचा सत्कार…!

बांदा : लोकमान्य परिवार, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.(मल्टी-स्टेट) सावंतवाडी क्षेत्रीय कार्यालयाने १४ वर्ष पुर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ वळंजू यांचा शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या जीवन प्रवासात बरीच शिखरे पार करत वळंजू यांनी बांदा व बांदा दशक्रोशीमध्ये सामाजिक, शैक्षणिक, कार्यात झोकून देऊन काम केले. गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी मदत केली. भाऊ वळंजू यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातही चांगले योगदान दिले. या सर्व कामाचा आलेख पाहून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.(मल्टी-स्टेट) या संस्थेचे त्यांचा संचालक गजानन धामणेकर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

समाजातील सर्व लोकांच्या आशीर्वादाच्या बळावर मला या सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक कामामध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याचे मत सत्काराला उत्तर देताना भाऊ वळंजू यांनी म्हटले.

यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पत्रकार शेखर सामंत,लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.मल्टी-स्टेट संचालक श्री.गजानन धामणेकर, श्री पंढरी परब, श्री सुबोध गावडे, श्री प्रभाकर पाटकर, श्री विठ्ठल प्रभु
रिजनल मॅनेजर,श्री आनंद सामंत. कार्यक्रमाच्या शेवटी रंगी रंगीला महाराष्ट्र हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.