भाजपा महीला मोर्चाकडून सावित्रीबाईंना अभिवादन…!

वेंगुर्ले : भारतातील पहील्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यारया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .

आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणारया सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस . भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचे काम केले . ज्या काळात मुलींचे शिक्षण म्हणजे अशक्य गोष्ट होती , त्या काळात ज्योतीबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी सुरुवात केली आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली , अशा प्रकारे आदरांजली वाहण्यात आली .

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर व महीला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, ता. सरचिटनीस बाबली वायंगणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर, नगरसेवीका साक्षी पेडणेकर व ईशा मोंडकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, स. ई. चेंदवणकर, छोटु कुबल उपस्थित होते.