ऋन्मय राजेश शिरवलकर त्याने तायक्वांदो स्पर्धेत मिळवले कांस्यपदक
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकल्प मध्ये 34 वी राज्यस्तरीय तायकांडो स्पर्धेत कुमार ऋन्मय राजेश शिरवलकर याने कांस्यपदक पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ही स्पर्धा दिनांक 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पार पडली.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ऋन्मय राजेश शिरवलकर याने 23 ते 25 किलो वजनी गटात आपले उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून कांस्यपदक पटकावले आहे.कणकवली नगर वाचनालय येथे सुरू असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तो बरीच वर्ष सराव करत आहे. या आधी ऋन्मयने अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन पदके मिळवली आहेत त्यामुळे सर्व स्तरातून ऋन्मय चे कौतुक होत आहे.