राणेंचा संयमीपणा २० तारीखनंतर राहणार नाही – परशुराम उपरकर यांची टीका

12

 

कणकवली दि.१२ नोव्हेंबर (प्रतिनिधी)

राणेंचा संयमीपणा २० तारीखनंतर राहणार नाही – परशुराम उपरकर यांची टीका

बाबा परब आणि आनंद शिरवलकर यांची क्लिप बाहेर आल्यानंतर निलेश राणेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या किंवा तुम्ही गुन्हा दाखल करा,असा खुलासा निलेश राणे यांनी केला आहे. मात्र,निलेश राणे यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोण असतात? हे जनतेला माहीत असल्याचा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, ज्यांचे संभाषण व्हायरल झाले ते कोणाबरोबर असतात, हे सगळे जनतेला माहिती आहे.जर निलेश राणे माझा संबंध नाही.असे याबाबतीत म्हणत असतील तर मग चिपळूण मधील संदीप सावंत यांना झालेली मारहाण कोणी केली?मराठा समाजाच्या बैठकीला गेले नाहीत,एवढेच कारण त्यांचं होतं, म्हणून त्यांना मारहाण झाली.सिंधुदुर्ग भवन जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांसाठी केले होते,त्या ठिकाणी मारहाण केली गेली आहे, हे वाईट असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.

मागील निवडणूकांमध्ये राणेंचे पैसे वाटणा-या लोकांची काय वाईट अवस्था झाली आहे. हे पैसे वाटणा-यांनी लक्षात ठेवावे. २३ तारखेनंतर या सर्वांचे वाईट दिवस असतील , याबाबत पोलीस अधिक्षकांनी नोंद घ्यावी. असेही श्री. उपरकर यावेळी म्हणाले.