आमदार नितेश राणे यांचा ६० हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय निश्चित – अबिद नाईकांचा विश्वास  

25

 

देवगड (प्रतिनिधी) 

आमदार नितेश राणे यांचा ६० हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय निश्चित – अबिद नाईकांचा विश्वास  

विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणेंनी गेल्या दहा वर्षात विकासाची गंगा आणली आहे. देवगड तालुका पर्यटनाच्या नकाशावर नेला आहे. त्यांचे तळागाळातील लोकांशी जवळचे संबंध त्यामुळे नितेश राणे यांचा ६० हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज येथे व्यक्त केला.

नितेश राणे यांच्या प्रचारार्थ देवगड तालुक्यातील विजयदुर्ग, गिर्यें घरोघरी प्रचार केला. तसेच मोंड, बापर्डे येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, देवगड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रशीद खान, भाजप देवगड तालुकाध्यक्ष बंडू नारकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोयडे, राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, भाजप माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, अजित राणे, सुरेश देवगडकर, सौ. सायली कोयडे, माजी सरपंच रविंद्र अनभवने आदी उपस्थित होते.