लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी सदिच्छा भेटी 

13

 

देवगड (प्रतिनिधी)

लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी सदिच्छा भेटी 

लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश पारकर यांनी सदिच्छा भेटी दिल्यात.लिंगडाळ आणि देवगड कट्टा या दोन्ही गावात संदेश पारकर यांना जास्तीत जास्त मदत करणार आणि येथील स्थानिक आमदाराला घरी बसवणार असे उदगार येथील नागरिकांनी काढले.येत्या विधानसभेत येथील स्थानिक आमदाराला येथून हद्दपार करणार आणि हे दोन्ही गाव 100% भाई यांच्या पाठीशी राहणार असा निश्चय करण्यात आला.यावेळी गंगाराम आहिर, शंकर महाडिक, अमोल गायकवाड ,राजू नवलू , बाप्पा लोके, नारायण मुबरकर, कालिदास तोडणकर, विठू प्रभू, घनश्याम कोयडे, मनोज तारी, बंटी कोयडें, अभिषेक ढोके, हेमंत कोयडें, भगवान कोयडें, आणि ग्रामस्थ उपस्थित होते..