देवगड (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची बापर्डे जि प मतदार संघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून बुधवारी दिवसभरात बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर गडीताम्हाने मतदार संघात संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात गडीताम्हाणे तेलीवाडी कांशीराम भाडे आणि मधलीवाडी येथे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी लोकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद दिसून आला.घराणेशाहीला या भागातून हद्दपार करण्यासाठी संदेश पारकर यांना मदत करण्याचा ग्रामस्थानी संकल्प केला आहे. यावेळी त्याच्यासोबत विनायक कदम, पपु कदम, अजय ठुकरुल ,इमरान साठविलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.





