कणकवली (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे फित कापून झाले उद्घाटन
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, युवासेना उपतालुकप्रमुख प्रमुख उत्तम लोके, सुदाम तेली, राजू राठोड, सचिन सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, सी. आर.चव्हाण आदि उपस्थित होते.
यावेळी कार्यलयात संदेश पारकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कणकवली विधानसभा मतदार संघात अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन अर्ज मागे घेतले. याबद्दल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आभार मानले. याचे सर्व श्रेय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांना जात असल्याचे सांगितले.





