कणकवली विधानसभेत राणे विरुद्ध पारकर थेट लढत ; दोन संदेश ठरणार लक्षवेधी ; मतदार संघात एकूण ६ उमेदवार रिंगणात

82

 

कणकवली दि ४ नोव्हेंबर (प्रतिनिधी)

 

कणकवली विधानसभेत राणे विरुद्ध पारकर थेट लढत ; दोन संदेश ठरणार लक्षवेधी ; मतदार संघात एकूण ६ उमेदवार रिंगणात

कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात ८ उमेदवार उतरले होते. त्यातील अपक्ष प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम यांनी माघार घेतल्याने आता सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे नितेश राणे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर रोजी दु. ३ वाजेपर्यंत होती. छाननीत सर्व अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिर केले होते.

त्यामुळे आता या मतदारसंघात निवडणूक २०२४ साठी भाजपा महायुतीचे नितेश नारायण राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे संदेश भास्कर पारकर, अपक्ष उमेदवार संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, गणेश माने व बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांच्यात लढत होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार लक्ष्मण कुसेकर, सूर्यकांत पाटील उपस्थित होते.