कणकवली (प्रतिनिधी)
वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांचे निलंबन रद्द ; कणकवली वनक्षेत्रपाल पदी फेरनियुक्ती
मॅटचा उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या नियमबाह्य कार्यपद्धतीला दणका
कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांचे सावंतवाडी उपवनसंरक्षक यांनी केलेले निलंबन नियमबाह्य ठरवत घुणकीकर यांना कणकवली वनक्षेत्रपाल पदी फेरनियुक्तीचे आदेश मॅटने दिले. मॅट च्या आदेशानुसार राजेंद्र घुणकिकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार 4 नोव्हेंबर पासून स्वीकारला आहे.





