जामसंडे सहकारनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम मुणगेकर यांचे निधन

28

 

देवगड – प्रतिनिधी

जामसंडे सहकारनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम मुणगेकर यांचे निधन

जामसंडे सहकारनगर येथील निवृत्त शिक्षक तुकाराम फटू मुणगेकर (७७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच राहत्या घरी निधन झाले. जि. प. प्राथमिक शाळेत त्यांनी सुमारे ३५ वर्षे शिक्षकी सेवा बजावली होती. दापोली (जि. रत्नागिरी), देवगड तालुक्यातील पोंभुर्ले व मोंड येथील जि. प. प्राथमिक शाळेत त्यांनी ज्ञानदानाचे काम केले होते. मोंड जि. प. प्राथमिक शाळेतून ते सेवानिवृत्त झाले.

पश्चात पत्नी, मुलगा, दोन बहिणी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसायिक महेश मुणगेकर यांचे ते वडील होत. तर जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या शिक्षिका सौ. मानसी मुणगेकर यांच्या ते सासरे होत.