महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारात आघाडी , घरोघरी जात प्रचारावर दिला जातोय भर 

4

 

वैभववाडी (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारात आघाडी , घरोघरी जात प्रचारावर दिला जातोय भर 
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली असून विधानसभा मतदारसंघातील मतदार राजांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत. 
वैभववाडी तालुक्यातील सोनाई बौद्धवाडी येथे संदेश पारकर यांनी येथील ग्रामस्थांची सदिच्छा भेट दिली. यावेळी पूर्ण बौद्धवाडी ग्रामस्थ संदेश पारकर यांच्या पाठीशी राहणार अशी आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुका प्रमुख अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, संजय हिर्लेकर, रोहित पावसकर, नंदू शिंदे, मंथन सुतार, अनिल कदम, नितेश शेलार, समीर कोदे, हरी गुरव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.