संदेश पारकर यांनी घेतल्या नरडवे ग्रामस्थांच्या गाठीभेटी
कणकवली तालुक्यातील नरडवे गावात ग्रामस्थांची महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भेट घेत, विकास कामांबाबत चर्चा केली. तसेच नरडवे धरणाच्या अपूर्ण कामा बाबत चर्चा केली स्वतः उमेदवार घरी जाऊन भेट घेत असल्याने आपला हक्काचा माणूस म्हणून विधान सभेत हवा अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर, प्रथमेश सावंत, विकी सावंत उपस्थित होते.