कणकवली दि 2 नोव्हेंबर (प्रतिनिधी)
वीज पडून चार जनावरे दगावली ; शेतकऱ्याचे नुकसान संदेश पारकर यांनी घेतली त्या शेतकऱ्यांची भेट
विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली. या जनावरांमध्ये १ गाभण गाय व ३ बैल यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे श्री. बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन श्री. बाणे यांना प्रशासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.





