भीतीपोटी नितेश राणेंनी दिला माझ्याच नावाचा उमेदवार ; माझ्या उमेदवारीचा नितेश राणेंनी घेतला धसका  – संदेश पारकर

13

 

कणकवली  (तुळशीदास कुडतरकर)

भीतीपोटी नितेश राणेंनी दिला माझ्याच नावाचा उमेदवार ; माझ्या उमेदवारीचा नितेश राणेंनी घेतला धसका  – संदेश पारकर

कणकवली विधानसभा मतदारसंघातील दाखल उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यामधून जवळजवळ ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. पुढची प्रक्रिया ४ तारीखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आहे. जे अधिकृत उमेदवार शिल्लक राहतील, त्यांच्यात लढत होईल. मुस्लिम बांधवांमधून एक उमेदवार उभा केलेला आहे. नितेश राणे यांनी मतांची विभागणी व्हावी म्हणून मुस्लिम बांधवांचा उमेदवार देण्यात आला आहे. तसेच माझ्या नावाला साम्य असणारे संदेश परकर त्यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज वैध झालेला आहे.

संदेश पारकर यांच्या नावाची भीती किती नितेश राणेंनी घेतलेली आहे यावरून त्यांना दिसते.असा टोला पारकर यांनी लगावला आहे.हे दोन्ही उमेदवार आमदार नितेश राणे यांनीच रिंगणात उतरले आहेत.असा आरोप त्यांनी राणेंवर केला. राणेंनी माझ्या उमेदवारीचा धसका घेतला आहे.त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित होणार आहे.त्यामुळेच राणे चलबिचल झाले आहेत.असे पारकर म्हणाले.

छाननी नंतर अर्ज वैद्य ठरल्यानंतर पारकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिली यावेळी ते बोलत होते.