भात कापणीचा हंगाम सुरू आहे त्यात आज दिवाळीचा पहिला दिवस या पहिल्या दिवशीच शेतकरी व सर्वसामान्य जनतेची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून देवगड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वांची चांगलीच दाणादाण उडाली.
परतीच्या पावसाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जोरदार बॅटिंग करत चांगलेच झोडपून काढले . ढगांचा कडकडाट व विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला.काही ठिकाणी विजा पडल्यात विद्युत पुरवठा देखील पूर्णत: खंडित झाला.
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला. गेल्या काही वर्षात ऋतुचक्रातील होणाऱ्या वारंवार बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे आणि यामुळे शेती बागायतींची मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आता शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे