नरडवे येथील भाजप युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना उ.बा.ठा मध्ये प्रवेश
भाजपच्या नरडवे येथील भ्रष्टाचाराला कंटाळून नरडवे येथील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत कनेडी शाखेत शिवसेना तालुकाप्रमुख श्री प्रथमेश मोहनराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरज अरविंद सावंत, प्रफुल गणपत मर्गज, मंदार मधुकर शिंदे, तुषार राजचंद्र बाईत, सतीश सत्यवान मर्गज यांनी प्रवेश केला.
ठेकेदारी एकाच व्यक्तीला दिली जाते आणि बोगस कामे करून भ्रष्टाचार केला जातो. युवा तरुण बेरोजगार असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष दिला जात नाही या सर्व परिस्थितीला कंटाळून येणाऱ्या विधानसभेला सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी उमेदवार संदेश पारकर यांचे निष्ठेने काम करून त्यांना विजयी करणार अशी या तरुणांनी यावेळी ग्वाही दिली.
यावेळी श्री प्रथमेश सावंत, बेनी डिसोजा, मुकेश सावंत, सतीश परब, संतोष सावंत, गणेश शिवडावकर, तुषार गावकर, संतोष दळवी, अर्जुन कांबळे, संतोष कांबळे, सुदर्शन रासम आदी प्रमुख उपस्थित होते .