देवगड आनंदवाडी येथील मच्छिमार करण कोयंडे यांचे निधन

38

 

देवगड आनंदवाडी येथील मच्छिमार करण कोयंडे यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड आनंदवाडी पश्चिमवाडा येथील मच्छीमार व्यावसायिक करण कमलाकर कोयंडे (४७) यांचे मंगळवारी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने उपजिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारादरम्यान निधन झाले.ते नाना या नावाने सुपरिचित होते. देवगड येथील आनंदवाडी क्रिकेट क्लबचे ते सदस्य होते. तसेच भाजपचे आनंदवाडी बुथ क्रमांक ८ चे ते अध्यक्ष होते. गावातील सामाजिक, धार्मिक तसेच क्रीडाक्षेत्रात त्यांचे सक्रिय योगदान होते.

देवगड आनंदवाडी येथील स्मशानभूमी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चात आई,पत्नी,दोन मुली, मुलगा,भाऊ ,भावजय, तीन बहिणी, असा मोठा परिवार आहे.मालवण नगरपंचायत येथील कर्मचारी नितीन कोयंडे त्यांचे ते भाऊ होत.