कसिनोचा प्रतिनिधीत्व करणारा आमदार कणकवलीत नको -निलेश राणे 

22

 

कणकवली (प्रतीनीधी)

कसिनोचा प्रतिनिधीत्व करणारा आमदार कणकवलीत नको -निलेश राणे 

गोव्याच्या कसिनोचा प्रतिनिधित्व करणारा
आमदार कणकवलीत नकोय. तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचा आवाज घुमतो अशा आमदार नितेश राणेंनाच कणकवलीतील मतदार आपला प्रतिनिधी म्हणून निवडणार असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीतील प्रचार सभेत ते बोलत होते. निलेश राणे म्हणाले, नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षात प्रत्येक मतदाराशी नाळ जोडली. कोट्यवधीचा निधी आणला. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झाले. त्यामूळेच एवढ्या कडक उन्हातही हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या सभेला उपस्थित राहिला आहे. त्यांचा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्रात निश्चितपणे घुमणार आहे. तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या पाठीशी संपूर्ण जनता आहे. या दोहोंच्या मध्ये मी कुडाळ मधून लढतोय. त्यामुळे माझ्याकडेही लक्ष ठेवा असे श्री. राणे म्हणाले.