राहायला, खायला आणि कपडे घालायला शिकवलेल्यानी माझ्यावर टीका करू नये ; तेली,उपरकर यांचा राणेंनी घेतला समाचार

14

 

कणकवली दि २८ ऑक्टोबर (तुळशीदास कुडतरकर)

राहायला, खायला आणि कपडे घालायला शिकवलेल्यानी माझ्यावर टीका करू नये ; तेली,उपरकर यांचा राणेंनी घेतला समाचार 

भाजप नेते नारायण राणे यांनी राजन तेली परशुराम उपरकर यांनाचा चांगलाच समाचार घेतला जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा .माझ्यावर टीका करतात. अरे तुम्हाला राहायला खायला आणि कपडे घालायला मी शिकवले कसे राहायचे हे तुम्हाला शिकवले ते आता माझ्यावर टीका करता .हा राजन तेली मुंबई बीकेसी मध्ये ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्याला विचारा चार कोटीचा फ्लॅट मी घेऊन दिला. सतीश सावंतला सुद्धा तेथे चार कोटीचा फ्लॅट घेऊन दिला. उपरकर माझ्यासोबत होता त्यावेळी दुसऱ्याच्या घरात राहत होता त्याला मी स्वतःचे घर बांधायला लावले. या लोकांनी माझ्यावर टीका करावी आणि ती मी ऐकून घ्यावी असे होणार नाही. मी टीकेचा हिशोब नियमित चुकता करतो कारण मी कोणाच्या बसण्या उठण्यात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी केलेले काम बोलत आहे. तुम्ही एक बालवाडी उभी केली असेल तर दाखवा अशा खरपूस शब्दात उबाठा शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचा घेतला.